अनिवासी भारतीय आयुक्तपद डॉ. विल्फे्रड मिस्किता यांना देण्यात येणार असल्याचे भाजपमधील सूत्रांनी काल सांगितले. दिगंबर कामत सरकार असताना एदुआर्द फालेरो हे अनिवासी भारतीय आयुक्त होते.
आता मनोहर पर्रीकर यांच्या नेतृत्वाखालील भाजपचे सरकार सत्तेवर आल्याने भाजपचे नेते असलेले डॉ. विल्फ्रेड मिस्किता हे अनिवासी भारतीय आयुक्त म्हणून पदभार स्वीकारण्यास सज्ज झाले आहेत.