रामनगर पोलीस चौकीची जीप गोव्याहून कर्नाटकच्यादिशेने जात होते. ती मोले चेकनाक्यावर पोचली असताना मोले अबकारी खात्याने जीपची झडती घेतली. त्यावेळी या जीपमध्ये पेट्रोलचे तीन भरलेले कॅन (सुमारे ७५ लिटर्स) त्याशिवाय २८ बाटल्या रॉयल स्टॅग व्हिस्की, १२ बाटल्या मेकडॉनल व्हिस्की, दोन बाटल्या रॉयल व्हिस्की, एक बाटली ओल्ड मॉन्क रम, एक बाटली हेवडर्स व्हिस्की, १२ बाटल्या बियरीच्या बाटल्या, पाच बाटल्या काजू फेणी एवढी दारू आढळली.
दारु नेण्यासंबंधीचा कसलाही परवाना पोलीस सादर करू शकले नाहीत. त्यामुळे चालक व उपनिरीक्षक यांना अबकारी कायदा १९६४ कलम ५२ खाली अटक केली. मोले अबकारी खात्याचे अधिकारी समीत नायक, फोंडा तालुका अबकारी निरीक्षक आलेक्स आद्रेत, कुळे पोलीस निरीक्षक जिवबा दळवी, अबकारी खात्याचे संदेश शेटकर, भरत पागी व जयवंत सावंत यांनी ही कारवाई केली. कुळे निरीक्षक जिवबा दळवी करीत पुढील तपास आहेत.