राज्यात कॉंग्रेस पक्षाचे संघटन मजबूत करण्यावर भर दिला जाणार आहे. लोकांच्या समस्या घेऊन रस्त्यावर उतरणार आहे, असे प्रतिपादन नवनियुक्त गोवा प्रदेश कॉंग्रेस समितीचे अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी पदभार स्वीकारल्यानंतर आयोजित स्वागत समारंभ सभेत बोलताना काल केले.
कॉंग्रेस भवनामध्ये एका कार्यक्रमात मावळते प्रदेशाध्यक्ष शांताराम नाईक यांनी नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष चोडणकर यांच्याकडे सूत्रे प्रदान केली. यावेळी गोवा प्रभारी डॉ. ए. चेल्लाकुमार, अमित देशमुख, विरोधी पक्षनेते चंद्रकांत कवळेकर, आमदार प्रतापसिंह राणे, दिगंबर कामत, लुईझीन फालेरो, रवी नाईक, आलेक्स रेजिनाल्ड, जेनिफर मोन्सेरात, फ्रान्सीस सिल्वेरा, ऍन्थोनी फर्नांडिस, आमदार डिसा, क्लाफासियो डायस, दयानंद सोपटे, नीळकंठ हर्ळणकर, फिलीप नेरी रॉड्रीगीस, महिला अध्यक्ष प्रतिमा कुतिन्हो, माजी केंद्रीय मंत्री रमाकांत खलप तसेच कॉंग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थिती होती.