अडीच महिन्यांत ७२ हजार विदेशी पर्यटक गोव्यात दाखल

0
112

यंदाच्या पर्यटक हंगामातील पहिल्या ७४ दिवसांत २२४ चार्टर फ्लाईटमधून ६१,१५३ रशियन पर्यटकांनी गोव्याला भेट दिली. पर्यटन खात्याकडून मिळालेल्या माहितीनुसार १ ऑक्टोबर ते १३ डिसेंबर २०१७ या काळात २९२ चार्टर फ्लाईटमधून ७१,७८१ विदेशी पर्यटकांनी गोव्याला भेट दिली आहे. ऑक्टोबर महिन्यात ५४ चार्टर फ्लाईट, नोव्हेंबरमध्ये १६४ चार्टर फ्लाईट आली आहेत.

गेल्या कित्येक वर्षांपासून रशियातून पर्यटक मोठ्या प्रमाणात गोव्यात येत आहेत. यंदाच्या पर्यटक हंगामात ऑक्टोबर महिन्यात रशियामधून ४८ चार्टर फ्लाईटमधून १४००९, नोव्हेंबरमध्ये १२५ चार्टर फ्लाईटमधून ३३,७३४ आणि १३ डिसेंबरपर्यंत ५१ चार्टर फ्लाईटमधून १३४१० पर्यटक गोवा भेटीवर आले. यंदाही रशियन पर्यटकांची संख्या वाढत आहे.

यू.के.मधून ४५ चार्टर फ्लाईटमधून १२,६२५ पर्यटक आले आहेत. यूकेमधून नोव्हेंबर महिन्यात २५ चार्टर फ्लाईटमधून ७२९१ पर्यटक दाखल झाले. फिनलॅण्डमधून ११ चार्टर फ्लाईटमधून १९२१ पर्यटक आले आहेत. कझाकिस्तानमधून ९ चार्टर फ्लाईटमधून १९९० पर्यटक आले आहेत. तर इराणमधून ३ चार्टर फ्लाईटमधून ९२ पर्यटकांनी भेट दिली. जर्मनी, युक्रेन, लुथानिया या देशांतून एकही चार्टर फ्लाईटची या काळात नोंद झालेली नाही. आत्तापर्यंत विदेेशातून येणार्‍या चार्टर फ्लाईटनी तीनशेची संख्या पार केली आहे.