गोवा सरकारचा निर्णय धोकादायक ः राजेंद्र केरकर

0
133

कर्नाटकला म्हादईचे पाणी देण्याचा गोवा सरकारचा निर्णय हा धोक्याचा असून त्याचे गंभीर परिणा’ भविष्यात गोव्याला भोगावे लागतील. त्या’ुळे कर्नाटकला पाणी देण्यासाठीच्या निर्णयाचा सरकारने फेरविचार करावा, अशी मागणी म्हादई बचाव अभियानचे एक नेते राजेंद्र केरकर यांनी काल पत्रकारांशी बोलताना केली. गोव्याला म्हादईचे पाणी कर्नाटकला दिले तर त्याचे दूरगामी परिणाम गोव्याला भोगावे लागतील, असे केरकर म्हणाले.

कर्नाटकने म्हादईने पाणी वळवल्यास गोव्याच्या पर्यावरणावर गंभीर परिणाम होणार असल्यानेच म्हादई बचाव अभियानने त्याबाबत सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती.
कणकुंबी येथील धरणाचे काम बंद ठेवण्याचा आदेश न्यायालयाने कर्नाटकला दिला होता. पण कर्नाटकने धरणाचे काम चालूच ठेवले आहे. सरकारने कर्नाटकला पाणी देण्याचा जो निर्णय घेतलेला आहे त्या पार्श्‍वभूमीवर म्हादई बचाव अभियान लवकरच आपली पुढील कृती ठरवणार असल्याचे केरकर यांनी सांगितले. अभियानची शुक्रवारी (काल) बैठक झाल्याचे त्यांनी सांगितले.