
>> भारताविरुद्धचा पहिला एकदिवसीय सामना ७ गड्यांनी जिंकला
रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळणार्या टीम इंडियाला काल रविवारी श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात ७ गड्यांनी दारुण पराभव पत्करावा लागला. भारताने ठेवलेले ११३ धावांचे माफक लक्ष्य २०.४ षटकांत गाठत लंकेने सलग १२ एकदिवसीय सामन्यांतील पराभवाच्या मालिकेला ब्रेक लगावला. या विजयासह श्रीलंकेने तीन सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली.
तत्पूर्वी, श्रीलंकेचा कर्णधार थिसारा परेराने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. खेळपट्टीचे स्वरुप पाहून त्याने घेतलेला हा निर्णय त्याच्या गोलंदाजांनी सार्थ ठरवला. सुरंगा लकमल, मॅथ्यूज व प्रदीप या मध्यमगती त्रिकुटाने स्विंग गोलंदाजीचे उत्कृष्ट दर्शन घडवत टीम इंडियाची १७व्या ७ बाद २७ अशी केविलवाणी स्थिती केली. यावेळी भारतीय संघ ३८ षटकापर्यंत टिकेल असे वाटत नव्हते. परंतु, माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने शेपटाला हाताशी धरून भारताला एकदिवसीय क्रिकेटमधील आपल्या नीचांकी धावसंख्येच्या (५४ धावा, वि. श्रीलंका, शारजा, वर्ष २०००) पार नेले. कुलदीप यादवसह आठव्या गड्याासाठी धोनीने ४१ धावा जोडल्या.
कुलदीपच्या पतनानंतर धोनीने धोका पत्करताना संघाला शतकी वेस ओलांडून दिली. ३८.२ षटकांत भारताचा संपूर्ण संघ ११२ धावांत संपला. भारताप्रमाणेच लंकेच्या डावाची सुरुवातही खराब झाली. फक्त ७ धावांवर लंकेचा पहिला बळी गेला. गुणथिलका १ धाव करून बाद झाला. त्यानंतर संघाची धावसंख्या १९ झालेली असताना थिरिमानेला भुवीने शून्यावर माघारी पाठवत लंकेला दुसरा धक्का दिला. १९ धावांत दोन बळी गमावल्यानंतर थरंगा आणि मॅथ्यूजने डाव सावरला. दोन्ही खेळाडूंनी लंकेची धावसंख्या ६५ पर्यंत पोहोचवली. अर्धशतकाच्या जवळ पोहोचलेला थरंगा ४९ धावांवर बाद झाला. त्यानंतर मॅथ्यूज आणि डिकवेला यांनी शेवटपर्यंत नाबाद राहत संघाला विजय मिळवून दिला. सुरंगा लकमल सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला. मालिकेतील दुसरा सामना मोहाली येथे १३ डिसेंबर रोजी खेळविला जाणार आहे.
धावफलक
भारत ः रोहित शर्मा झे. डिकवेला गो. लकमल २, शिखर धवन पायचीत गो. म२थ्यूज ०, श्रेयस अय्यर त्रि. गो. प्रदीप ९, दिनेश कार्तिक पायचीत गो. लकमल ०, मनीष पांडे झे. मॅथ्यूज गो. लकमल २, महेंद्रसिंग धोनी झे. गुणथिलका गो. परेरा ६५, हार्दिक पंड्या झे. मॅथ्यूज गो. प्रदीप १०, भुवनेश्वर कुमार झे. डिकवेला गो. लकमल ०, कुलदीप यादव यष्टिचीत डिकवेला गो. धनंजया १९, जसप्रीत बुमराह त्रि. गो. पथिराना ०, युजवेंद्र चहल नाबाद ०, अवांतर ५, एकूण ३८.२ षटकांत सर्वबाद ११२
गोलंदाजी ः सुरंगा लकमल १०-४-१३-४, अँजेलो मॅथ्यूज ५-२-८-१, नुवान प्रदीप १०-४-३७-२, थिसारा परेरा ४.२-०-२९-१, अकिला धनंजया ५-२-७-१, सचित पथिराना ४-१-१६-१
श्रीलंका ः दनुष्का गुणथिलका झे. धोनी गो. बुमराह १, उपुल थरंगा झे. धवन गो. पंड्या ४९, लाहिरु थिरिमाने त्रि. गो. भुवनेश्वर ०, अँजेलो मॅथ्यूज नाबाद २५, निरोशन डिकवेला नाबाद २६, अवांतर १३, एकूण २०.४ षटकांत ३ बाद ११४
गोलंदाजी ः ८.४-१-४२-१, जसप्रीत बुमराह ७-१-३२-१, हार्दिक पंड्या ५-०-३९-१