निरंकाल अपघातात दुचाकीस्वार ठार

0
143

कोडार-निरंकाल येथे पार्क केलेल्या बसला दुचाकीची जोरदार धडक बसल्याने नाफीस महमद (२७, बिहार सध्या राहणारा कोडार) या दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. सदर अपघात काल दुपारी ३ वा. घडला. पोलीसानी अपघाताचा पंचनामा करून मृतदेह शवचिकित्सेसाठी गोमेकॉत पाठवून दिला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार जीए ०२ पी ३६६७ क्रमांकाची दुचाकी घेऊन नाफीस महमद खांडेपारहून कोडार येथे जात होता. कोडार येथील नंदवन फार्मसमोरील मुख्य रस्त्याच्या बाजूला पार्क केलेल्या जीए ०१ झेड ८७२१ क्रमांकाच्या पर्यटक बसला त्याच्या दुचाकीची जोरदार धडक बसली. हल्मेट न घातल्याने दुचाकीचालक नाफीसचे डोके रस्त्यावर आपटल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. फोंडा पोलीस स्थानकाचे निरीक्षक सुदेश नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अरूण बाक्रे यांनी अपघाताचा पंचनामा केला.