>> क्रिझोस्तिमो रॉड्रिगीस चषक
कोलवातील चौथ्या वॉर्डमधील क्रॉस रोड बॉईज ‘अ’ संघाने क्रॉस रोड बॉईज ‘ब’ संघाचा टायब्रेकरवर ६-४ असा पराभव करत क्रिझोस्तिमो रॉड्रिगीस चषक पटकावला. आंतरवॉर्ड स्तरावरील या स्पर्धेचे आयोजन कोलवा येथील फिशरमॅन बॉईज यांनी केले होते. निर्धारित वेळेत ‘अ’ संघाकडून ४७व्या मिनिटाला किथ रॉड्रीगीस याने व ४९व्या मिनिटाला फ्रान्सिस पाउसकर याने गोल नोंदविला. जीझस कार्दोझ याने लागोपाठ दोन गोल करत ‘ब’ संघाला २-२ अशी बरोबरी साधून दिली. निर्धारित वेळेत सामना २-२ असा बरोबरीत राहिल्याने टायब्रेकरचा अवलंब करावा लागला. यात ‘अ’ संघ वरचढ ठरला. बक्षीस वितरण समारंभाला कोलवाचे सरपंच आंतोनियो लियो फर्नांडिस प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांच्याच हस्ते बक्षिसांचे वितरण करण्यात आले. विजेत्या ‘अ’ संघाने ३० हजार तर उपविजेत्या ‘ब’ संघाने २० हजार रुपयांची कमाई केली.