नेमबाजांकडून निराशा

0
74

आयएसएसएफ वर्ल्ड कप फायनल्स नेमबाजी स्पर्धेत गुरुवारचा दिवस भारताचासाठी निराशाजनक ठरला. जीतू राय व पूजा घाटकर यांना काल अपेक्षित कामगिरी करता आली नाही. पुरुषांच्या १० मीटर एअर पिस्तोल प्रकारात नवव्या स्थानी राहिल्याने ८ खेळाडूंच्या अंतिम फेरीत त्याला स्थान मिळाले नाही. त्याने ९४, ९६, ९६, ९७, ९५, ९४ असे एकूण ६७२ गुण कमावले. महिलांच्या १० मीटर एअर रायफल प्रकारात पूजा घाटकरदेखील नवव्या क्रमांकावर राहिली. पूजाने ४१२.४ गुण मिळविले. नॉर्वेच्या मालिन वेस्टर्नहॅमने ४१२.५ गुणांसह आठवे स्थान मिळवून अंतिम फेरी गाठली.