गोवा मानवाधिकार आयोगाने वीज खात्याच्या स्मार्ट मीटर तक्रारींसाठी ॲमिकस क्युरीची नियुक्ती केली आहे. या प्रकरणातील पुढील सुनावणी बुधवार दि. 24 जून रोजी घेतली जाणार आहे.
वीज खात्याकडून राज्यात स्मार्ट मीटर बसविण्याचे काम सुरू आहे. काही ग्राहकांकडून स्मार्ट मीटरला विरोध केला जात असून याबाबत गोवा मानवाधिकार आयोगाकडे तक्रार केली आहे. स्मार्ट वीज मीटरच्या बसविण्यासंदर्भात नागरिकांच्या तक्रारी पद्धतशीरपणे ऐकून घेण्यासाठी आणि त्यांचे निवारण करण्यासाठी ॲमिकस क्युरीची नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला आहे.
गेल्या महिन्यात आयोगाने या प्रकल्पासंदर्भात नागरिकांनी उपस्थित केलेल्या तक्रारीची स्वेच्छा दखल घेतली होती. याच विषयावरील सुनावणीच्या वेळी ॲमिकस क्युरीची नियुक्ती करण्याचा निर्णय
घेण्यात आला.