Home बातम्या मान्सूनच्या प्रगतीसाठी हवामान स्थिती अनुकूल

मान्सूनच्या प्रगतीसाठी हवामान स्थिती अनुकूल

0

नैऋत्य मोसमी पावसाचे अजूनपर्यंत केरळमध्ये आगमन झालेले नाही. दरवर्षी 1 जूनला मान्सून केरळममध्ये दाखल होतो. तथापि, हवामानातील बदलामुळे मान्सून यावर्षी वेळेवर दाखल होण्यास विलंब झाला आहे. पुढील 2-3 दिवसांत नैऋत्य मोसमी वाऱ्यांच्या वाटचालीसाठी परिस्थिती अनुकूल आहे, असे भारतीय हवामान खात्याने यांनी काल जारी केलेल्या पत्रकात म्हटले आहे.
भारतीय हवामान खात्याने यंदा 26 मे रोजी मान्सून केरळममध्ये दाखल होण्याची शक्यता व्यक्त केली होती. त्यामुळे उष्णतेमुळे हैराण झालेल्या नागरिकांनी सुस्कारा सोडला होता. तथापि, 1 जून उजाडला तरी मान्सून केरळममध्ये दाखल झालेला नाही.

मान्सूनच्या वाटचालीसाठी सध्या परिस्थिती अनुकूल झाली आहे. या वाऱ्यांमुळे मान्सून आग्नेय अरबी समुद्राचे काही भाग, लक्षद्वीप बेटे, केरळम आणि तामिळनाडूचे काही भाग, नैऋत्य, पश्चिम-मध्य, पूर्व-मध्य आणि ईशान्य बंगालच्या उपसागराचे काही भाग आणि आग्नेय बंगालच्या उपसागराचे उर्वरित भाग आणखी पुढे सरकण्याची शक्यता व्यक्त केली आहे. छत्तीसगडला लागून असलेल्या पूर्व विदर्भावरील वरच्या हवेतील चक्रीय प्रवाह आता आग्नेय मध्य प्रदेश आणि आसपासच्या प्रदेशावर असून तो समुद्रसपाटीपासून 1.5 किमी उंचीपर्यंत विस्तारलेला आहे.

3 जूनपासून पावसाची शक्यता
येथील हवामान विभागाने राज्यात येत्या 3 ते 5 जून दरम्यान पावसाची शक्यता व्यक्ती केली असून, यलो अलर्ट जारी केला आहे. या काळात 40 ते 50 किलोमीटर प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे.
तापमान वाढले
पावसाचे आगमन लांबल्याने राज्यातील नागरिकांना उष्णतेचा त्रास सहन करावा लागत आहे. मागील चोवीस तासांत पणजी येथे कमाल तापमान 35.6 आणि किमान तापमान 28.5 अंश सेल्सिअस नोंद झाले.