Home बातम्या न्यायाधीश नियुक्तीसाठी पाच नावांची शिफारस

न्यायाधीश नियुक्तीसाठी पाच नावांची शिफारस

0

सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमने सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश नियुक्त करण्यासाठी पाच नावांची शिफारस केंद्र सरकारकडे पाठवली आहे. यामध्ये चार उच्च न्यायालयांचे मुख्य न्यायाधीश आणि एक वरिष्ठ महिला वकील यांचा समावेश आहे.
कॉलेजियमने पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश शील नागू, मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश श्री चंद्रशेखर, मध्यप्रदेश उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश संजीव सचदेवा, जम्मू-काश्मीर आणि लडाख उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश अरुण पल्ली आणि वरिष्ठ वकील व्ही. मोहना यांची नावे पाठवली आहेत.

ही शिफारस 22 आणि 27 मे रोजी झालेल्या कॉलेजियमच्या बैठकांमध्ये करण्यात आली. ज्येष्ठ वकील व्ही. मोहना यांच्या नियुक्तीमुळे सर्वोच्च न्यायालयात महिलांचा सहभाग मजबूत होण्याची अपेक्षा आहे. सध्या सर्वोच्च न्यायालयात न्यायमूर्ती बी. व्ही. नागरत्ना या एकमेव महिला न्यायाधीश आहेत. ऑगस्ट 2021 नंतर कोणत्याही महिलेची सर्वोच्च न्यायालयात नियुक्ती झालेली नाही.
सध्या सर्वोच्च न्यायालयात 32 न्यायाधीश आहेत. जूनमध्ये न्यायमूर्ती जे. के. माहेश्वरी आणि न्यायमूर्ती पंकज मित्तल यांच्या निवृत्तीनंतर आणखी दोन पदे रिक्त होतील.