Home बातम्या भीतीपोटी पेट्रोल-डिझेलचीअतिरिक्त खरेदी करू नका

भीतीपोटी पेट्रोल-डिझेलचीअतिरिक्त खरेदी करू नका

0

तेल कंपन्यांचे आवाहन; इंधनाचा पुरेसा साठा उपलब्ध

सार्वजनिक क्षेत्रातील तेल विपणन कंपन्या इंडियन ऑइल, भारत पेट्रोलियम (बीपीसीएल) आणि हिंदुस्थान पेट्रोलियम (एचपीसीएल) यांनी देशभरात पेट्रोल, डिझेल आणि एलपीजीचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याची माहिती दिली आहे. वाढत्या मागणीच्या पार्श्वभूमीवरही इंधन पुरवठा सुरळीत सुरू असल्याचे कंपन्यांनी स्पष्ट केले.
1 ते 24 मे या कालावधीत गोव्यात पेट्रोल विक्रीत 7.62 टक्के, तर डिझेल विक्रीत 10.07 टक्के वाढ नोंदविण्यात आली. खासगी पुरवठादारांच्या तुलनेत सार्वजनिक क्षेत्रातील पंपांवर इंधनाचे दर कमी असल्याने अनेक व्यावसायिक आणि संस्थात्मक ग्राहक सार्वजनिक क्षेत्रातील पेट्रोल पंपांकडे वळत असल्याचे कंपन्यांनी सांगितले. इंधनाचा पुरेसा साठा उपलब्ध असून घाबरून जादा खरेदी करण्याची गरज नाही. पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी सर्व आवश्यक उपाययोजना करण्यात येत आहेत, असे तेल कंपन्यांनी स्पष्ट केले.