Home बातम्या ‘त्या’ चालकाचे ड्रायव्हिंगलायसन्स रद्दची शिफारस

‘त्या’ चालकाचे ड्रायव्हिंगलायसन्स रद्दची शिफारस

0

दोनापावल सर्कलजवळील एका अपघाताला जबाबदार कारचालक जगदीश सरदेसाई (रा. दोनापावल) याचा वाहन चालविण्याचा परवाना (ड्रायव्हिंग लायसन्स) निलंबित करण्याची शिफारस पणजी पोलिसांकडून वाहतूक खात्याकडे केली जाणार आहे. मंगळवारी रात्री जगदीश सरदेसाईने मद्याच्या नशेत निष्काळजीपणे आणि भरधाव वेगाने बीएमडब्लू कार चालवून तीन वाहनांना धडक दिली होती. या प्रकरणी अटक केलेल्या जगदीशची काल जामिनावर सुटका करण्यात आली. या अपघात प्रकरणाचा पणजी पोलीस तपास करीत आहेत.