विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला उद्देशून केलेल्या एका विधानामुळे देशात राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. मोदी, शहा आणि आरएसएस देशद्रोही व गद्दार आहेत, हे त्यांच्या कार्यकर्त्यांना सांगा, असे विधान राहुल गांधींनी रायबरेली येथे काल कार्यकर्त्यांना केले. या विधानावरून भाजप आक्रमक झाली आहे.
तुमच्याकडे आरएसएसचे कार्यकर्ते येतील, तेव्हा ते नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्याबद्दल बोलतील. तेव्हा त्यांच्या डोळ्यात डोळे घालून त्यांना सांगा की, ‘तुमचे पंतप्रधान देशद्रोही आहेत, तुमचे गृहमंत्री गद्दार आहेत आणि तुमची संघटनाही देशद्रोही आहे, असे विधान राहुल गांधी यांनी केले.