Home बातम्या रोशन रेडकरांच्या पत्नीचीपंचायत सदस्यपदी निवड

रोशन रेडकरांच्या पत्नीचीपंचायत सदस्यपदी निवड

0

हडफडे-नागवाचे सरपंच रोशन रेडकर यांना पंचायत संचालकांनी अपात्र ठरविल्याने रिक्त झालेल्या जागेवरील पोटनिवडणुकीत त्यांच्या पत्नी दीपिका रेडकर पंच सदस्य म्हणून बिनविरोध निवडून आल्या आहेत. माजी सरपंच रोशन रेडकर यांनी आपल्या प्रभागावरील वर्चस्व कायम ठेवले असून, त्या प्रभागातून त्यांनी पत्नी दीपिका रेडकर हिला पंच सदस्य म्हणून बिनविरोध निवडून आणले आहे. बर्च अग्नितांडव प्रकरणात तत्कालीन सरपंच रोशन रेडकर यांना पंचायत संचालकांनी अपात्र ठरवून पाच वर्षांसाठी निवडणूक लढविण्यास बंदी घातली आहे. हडफडे नागवा पंचायतीच्या या रिक्त झालेल्या प्रभागात पोटनिवडणूक घेण्यात आली होती. या पोटनिवडणुकीसाठी रोशन रेडकर यांची पत्नी दीपिका रेडकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यांच्याविरोधात एकही अर्ज दाखल न झाल्याने त्यांची पंच म्हणून बिनविरोध निवड झाली.