Home Featured मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातीलवाहनांची संख्या आता 1 वर

मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातीलवाहनांची संख्या आता 1 वर

0

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल आपल्या अधिकृत ताफ्यातील वाहनांची संख्या आता केवळ 1 वर आणली असल्याची माहिती दिली.

मध्यपूर्वेतील संघर्षामुळे जागतिक स्तरावर निर्माण झालेल्या पेट्रोलियम पदार्थांच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काटकसर करण्याचा सल्ला दिल्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. इलेक्ट्रिक कारचा वापर करण्याचा विचार आहे का, असे त्यांना विचारले असता अधिकृत कामासाठी इलेक्ट्रिक कार वापरण्याबाबत आपण विचार करीत असून, त्यासाठी नवी गाडी खरेदी करण्याचा विचार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. तसे केल्याने इंधन बचत होणार असल्याचे ते म्हणाले. दरम्यान, मुख्यमंत्र्यांच्या अधिकृत ताफ्यातील वाहनांची संख्या जास्त असल्याने त्यांच्यावर सोशल मीडियातून टीका होत होती आणि नरेंद्र मोदी यांनी इंधन बचतीचे आवाहन केल्यापासून या टीकेत जास्तच भर पडली होती. या पार्श्वभूमीवर काल मुख्यमंत्र्यांनी आपल्या अधिकृत ताफ्यातील वाहनांत मोठी घट केली.