Home बातम्या खूनाचा प्रयत्न केल्यानेचारजणांविरोधात गुन्हा

खूनाचा प्रयत्न केल्यानेचारजणांविरोधात गुन्हा

0

पणजी पोलिसांनी ताळगाव येथे एका युवकाचा खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणात चार युवकांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात दोन संशयित आरोपींना अटक केली आहे. हेमंत शिरोडकर आणि एकनाथ गवस अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत. मंगळवारी रात्री आशा महाल येथे ताळगाव येथील साहील या एका युवकाला लोखंडी सळी, दंडुक्याच्या साहाय्याने जबर मारहाण करण्यात आली आहे. या प्रकरणात पणजी पोलिसांनी हेमंत शिरोडकर (चिंबल), एकनाथ गवस (नागाळी हिल्स दोनापावल), राजू (दोनापावल) आणि वामनेश कुर्टीकर (ओशेल) यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात साहील कुर्टीकर याने तक्रार दाखल केली असून उपनिरीक्षक महादेव पेडणेकर तपास करीत आहेत.