जुने गोवे येथील कदंब पठारावरील महामार्गावर सोमवारी संध्याकाळी झालेल्या भीषण अपघातातील जखमी कारचालक शिवम कोलवेकर (27 वर्षे, रा. कुळे) यांचे बांबोळी येथील गोमेकॉ इस्पितळामध्ये उपचार सुरू असताना काल सकाळी निधन झाले. शिवम कोलवेकर याचा कारवरील ताबा सुटल्याने भरधाव कारची दुभाजक आणि विजेच्या खांबाला जोरदार धडक बसल्याने तो गंभीर जखमी झाला होता. त्याला उपचारासाठी बांबोळी येथील गोमेकॉमध्ये दाखल केले होते. तेथे उपचारादरम्यान काल त्याचे निधन झाले.