देशभरातील उन्हाचा तडाखा आणि असह्य उकाड्यामुळे नागरिक हैराण झालेले आहेत. अशावेळी यंदा अंदमानात मान्सूनचे आगमन निर्धारित वेळेच्या आधीच होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. ‘स्कायमेट’ या खासगी हवामान संस्थेच्या अंदाजानुसार, बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे मान्सूनला मोठी चालना मिळाली असून तो लवकरच अंदमानात दाखल होईल. भारतीय हवामान विभागानेही 14 ते 20 मे दरम्यान अंदमानच्या समुद्रात नैर्ऋत्य वारे वाहू लागतील, असा अंदाज दिला आहे.