Home बातम्या पर्वरीतील महामार्गाचाएक भाग बंदची सूचना

पर्वरीतील महामार्गाचाएक भाग बंदची सूचना

0

येत्या 20 मे पर्यंत बंद राहणार

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वर्क्स डिव्हिजन-7 (एनएच)च्या कार्यकारी अभियंत्यांनी पर्वरीतील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66 च्या विद्यमान मार्गावरील उजव्या बाजूचा काही भाग सर्व प्रकारच्या वाहनांसाठी बंद करण्याची अधिसूचना जारी केली आहे. 24 एप्रिल रोजी मध्यरात्रीपासून 20 मे 2026 पर्यंत हा मार्ग बंद राहणार आहे.

निओ मॅजेस्टिक हॉटेलजवळील प्रवेश मार्ग ते गौरी पेट्रोल पंप दरम्यानचा रस्ता बंद ठेवण्यात येणार आहे. सहापदरी एलिव्हेटेड कॉरिडॉर प्रकल्पाच्या कामांना गती देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. पणजीहून म्हापसा दिशेने जाणारी वाहतूक निओ मॅजेस्टिक हॉटेलजवळील डाव्या सर्व्हिस रोडवर वळवण्यात येईल. तसेच पुंडलिक नगर परिसरातील डेल्फिनोस जंक्शनकडील जोडरस्ता बंद राहणार आहे. बेती येथून म्हापसाकडे जाणाऱ्या वाहनांना गौरी पेट्रोल पंपाजवळील सर्व्हिस रोडवरून मार्ग उपलब्ध करून देण्यात येईल. बंद असलेल्या भागातील स्थानिक रहिवासी व व्यावसायिकांना ठराविक ठिकाणी सुरक्षित प्रवेश देण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

महामार्ग 66 वर सहापदरी एलिव्हेटेड कॉरिडॉर उभारणी या प्रकल्पांतर्गत दोन्ही बाजूच्या प्रवेश मार्गाचे काम सुरू आहे. हे काम जलद व सुरक्षितरीत्या पूर्ण करण्यासाठी हा तात्पुरता वाहतूक बदल लागू करण्यात आला आहे. नागरिकांनी प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.