वर्षभरापूर्वी जम्मू-काश्मिरच्या पहलगाम खोऱ्यात भीषण दहशतवादी हल्ला झाला होता. दहशतवाद्यांनी पर्यटकांना त्यांचा धर्म विचारून गोळ्या घातल्या. या हल्ल्यात देशभरातील 26 पर्यटक मृत्यूमुखी पडले होते. काल या हल्ल्याला एक वर्ष होत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडियावर पोस्ट या घटनेत बळी पडलेल्यांना श्रद्धांजली वाहिली.
एक राष्ट्र म्हणून आम्ही या दु:खात आणि संकल्पात एकत्र उभे आहोत. भारत कोणत्याही प्रकारच्या दहशतवादासमोर कधीही झुकणार नाही. दहशतवाद्यांचे क्रूर मनसुबे कधीही यशस्वी होणार नाहीत. पहलगाम हल्ल्यातील बळींचे बलिदान कधीही विसरले जाणार नाही. या दु:खातून सावरणाऱ्या शोकाकुल कुटुंबांच्या पाठीशी माझ्या सहवेदना आहेत, असेही मोदींनी म्हटले आहे.