पोलीस खात्याने पदावनती (डिमोशन) केलेल्या त्या सहा पोलीस निरीक्षकांची पुन्हा एकदा पोलीस निरीक्षकपदी वर्णी लावण्यात आली आहे. पोलीस महासंचालकांनी यासंबंधीचा आदेश काल जारी केला. मुंबई उच्च न्यायालयाच्या एका निर्देशानंतर पोलीस खात्याने पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत असलेल्या संध्या गुप्ता, टेरेन्स वाझ, विलेश दुर्भाटकर, सुनील गुडलर, सुशांत गावंस आणि राहुल धामशेकर या सहा जणांची पदावनती करून त्यांना उपनिरीक्षक केले होते. आता, पुन्हा एकदा त्या सहा जणांची पोलीस निरीक्षकपदी वर्णी लावण्यात आली आहे.