मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने इनफ इज इनफ संघटनेच्या मांडवी नदीत आणण्यात येणाऱ्या मोठ्या कॅसिनो जहाजाला विरोध करणाऱ्या जनहित याचिकेवर राज्य सरकार आणि कॅसिनो कंपनीला सविस्तर प्रतिज्ञापत्र शुक्रवार दि. 24 एप्रिलपर्यंत सादर करण्याचा आदेश काल दिला. या याचिकेवर पुढील सुनावणी सोमवार दि. 27 एप्रिल रोजी घेतली जाणार आहे.