Home बातम्या महापौर, उपमहापौरांची30 मार्चला होणार निवड

महापौर, उपमहापौरांची30 मार्चला होणार निवड

0

पणजी महानगरपालिकेच्या नूतन महापौर आणि उपमहापौर यांची निवड येत्या 30 मार्च रोजी सकाळी 11 वाजता करण्यात येणार आहे.

महानगरपालिकेच्या नुकत्याच घेण्यात आलेल्या निवडणुकीत भाजप आणि मंत्री बाबूश मोन्सेरात यांनी पुरस्कृत केलेल्या गटाचे 27 उमेदवार निवडून आले आहेत. उत्पल पर्रीकर यांनी पुरस्कृत केलेल्या आम्ही पणजीकर गटाचे 3 उमेदवार निवडून आले आहेत. महानगरपालिकेच्या निवड झालेल्या नगरसेवकांची पहिली बैठक दि. 30 मार्च रोजी सकाळी 11 वाजता घेतली जाणार आहे. यावेळी महापौर, उपमहापौर तसेच विविध समित्यांची निवड केली जाणार आहे.