Home बातम्या ‘सिनेमांतील धुम्रपानाचेवाढते चित्रण धोकादायक’

‘सिनेमांतील धुम्रपानाचेवाढते चित्रण धोकादायक’

0

चित्रपट, जाहिरात, वेबसिरीज, दूरचित्रवाणी मालिका आदींवरून धुम्रपानाचे जे वाढते चित्रण दाखवण्यात येत आहे ते भयावह असून त्याचे अनुकरण करीत तरुण पिढी धुम्रपानाच्या व्यसनाला बळी पडू शकते, अशी भीती काल गोव्याचे राज्यसभा खासदार सदानंद शेट तानावडे यांनी व्यक्त केली. राज्यसभेत बोलताना त्यांनी वरील गंभीर विषयाकडे लक्ष वेधले. देशातील युवा वर्गाचे आरोग्य व भविष्य सुरक्षित ठेवण्यासाठी तंबाखूचे चित्रण मर्यादित प्रमाणात व्हायला हवे. त्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे लागू करण्याची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तंबाखू सेवनामुळे कर्करोगासह अन्य विविध आजार होण्याचा धोका लक्षात घेऊन सरकारने पावले उचलावीत, अशी मागणी तानावडे यांनी केली.