येथील हवामान विभागाने राज्यात बुधवार दि. 18 आणि गुरुवार दि. 19 मार्च रोजी पावसाची शक्यता काल व्यक्त केली आहे. कर्नाटक ते तामिळनाडू दरम्यान तयार झालेले टर्फमुळे झालेल्या हवामानातील बदलामुळे हवामान विभागाने राज्यातील काही भागात 18 व 19 मार्चला पावसाची शक्यता व्यक्त करून यलो अलर्ट जारी केला आहे. राज्यात 30 ते 40 किलोमीटर प्रति तास वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. सध्या राज्यातील वातावरण ढगाळ बनले असून, राज्यात उष्णतेच्या प्रमाणात वाढ झाली आहे. मागील चोवीस तासांत पणजी येथे कमाल तापमान 33 अंश सेल्सिअस नोंद झाले. मुरगाव येथे किमान तापमान 23 अंश सेल्सिअस नोंद झाले.