गोवा माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावीच्या परीक्षेला शुक्रवार दि. 13 मार्चपासून प्रारंभ होत असून, ती 9 एप्रिलपर्यंत चालणार आहे. राज्यातील 20,659 विद्यार्थी दहावीच्या परीक्षेला बसणार आहेत. त्यात 10791 मुलगे आणि 9868 मुलींचा समावेश आहे. राज्यभरातील 32 केंद्रातून दहावीची परीक्षा घेतली जात आहे. या परीक्षेला सकाळी 9 वाजता प्रारंभ होणार असून, विद्यार्थ्यांनी अर्धा तास अगोदर परीक्षा केंद्रावर हजर राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.