नीती आयोगाने जारी केलेल्या आर्थिक आरोग्य निर्देशांकात गोवा राज्याने दुसरा क्रमांक मिळवला आहे, अशी माहिती काल मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी गोवा विधानसभेत दिली. त्याचा पुरावा म्हणून यावेळी मुख्यमंत्र्यांनी कागदपत्रेही विधानसभेत दाखवली. आर्थिक आरोग्य निर्देशांकात यंदा 73.1 गुणांसह ओडिशा हे राज्य पहिल्या स्थानी आहे, तर 54.7 गुणांसह आपले गोवा दुसऱ्या स्थानी असल्याची माहिती यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिली. तिसऱ्या स्थानी 50.5 गुणांसह झारखंड हे राज्य आहे. महालेखापालांच्या अहवालातून नीती आयोगाने हा अहवाल तयार केल्याची माहिती यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिली. गेल्या वर्षी या यादीत गोवा तिसऱ्या स्थानी होता. मात्र, यंदा राज्याने एका अंकाने झेप घेत दुसरे स्थान मिळवले आहे.