Home बातम्या घराला आग लागल्यानेमहिलेचा होरपळून मृत्यू

घराला आग लागल्यानेमहिलेचा होरपळून मृत्यू

0

सुकोल्डा-चिंचोणे येथे सोमवारी रात्री घराला लागलेल्या आगीत सुमती नाईक (70) ही महिला होरपळून मृत्युमूखी पडण्याची घडना घडली. रात्री 9.30 च्या दरम्यान ही घटना घडली. सुमती नाईक या आपल्या भावाबरोबर पत्र्याच्या शेडवजा घरात भाड्याने राहत होत्या. पत्र्याच्या घराला आग लागल्यानंतर आगीने पेट घेतला. त्यात त्या भाजल्याने जागीच मृत्युमुखी पडल्या. आगीच्या दुर्घटनेनंतर शेजाऱ्यांनी पाणी टाकून आग विझवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर कुंकळ्ळी येथील अग्निशामक दलाला माहिती देताच दलाचे जवान घटनास्थळी पोचले. त्यांनी बंबाच्या सहाय्याने आग विझवली. आगीचे नेमके कारण कळू शकले नसल्याचे अग्निशामक दलाने म्हटले आहे. सुमती नाईक या फुलांची विक्री करून उदरनिर्वाह करीत होत्या.