Home बातम्या माजी केंद्रीय मंत्री के. पी.उन्नीकृष्णन यांचे निधन

माजी केंद्रीय मंत्री के. पी.उन्नीकृष्णन यांचे निधन

0

प्रदीर्घ काळ संसदेत प्रतिनिधित्व करणारे ज्येष्ठ काँग्रेस नेते आणि माजी केंद्रीय मंत्री के. पी. उन्नीकृष्णन यांचे मंगळवारी पहाटे निधन झाले. वयाच्या 89 व्या वर्षी कोझिकोड येथील एका खासगी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून ते वयोमानाशी संबंधित आजारांनी त्रस्त होते. त्यांच्या पश्चात पत्नी अमृता आणि दोन मुली असा परिवार आहे. के.पी. उन्नीकृष्णन यांच्या नावावर केरळच्या राजकीय इतिहासात एक अनोखा विक्रम नोंदवला गेला होता. कोझिकोडमधील वडकारा या एकाच लोकसभा मतदारसंघाचे त्यांनी सलग 25 वर्षे (1971 ते 1996) प्रतिनिधित्व केले. या काळात त्यांनी तीन वेगवेगळ्या राजकीय पक्षांचे (काँग्रेस, काँग्रेस-यू आणि काँग्रेस-एस) प्रतिनिधित्व केले असले तरी, जनतेने त्यांच्यावर सदैव विश्वास दाखवला.