Home बातम्या भारतीय विमान उड्डाणे रद्द

भारतीय विमान उड्डाणे रद्द

0

दिल्लीहून तेल अवीवला जाणारे एअर इंडियाचे विमान मध्यमार्गाने मुंबईला परतावे लागले. नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (डीजीसीए) भारतीय विमान कंपन्यांना 11 देशांच्या हवाई हद्दीतून उड्डाण टाळण्याचा सल्ला दिला आहे, तर एअर इंडिया, इंडिगो, एअर इंडिया एक्सप्रेस, अकासा एअर आणि स्पाइसजेट यांनी मध्यपूर्वेतील त्यांच्या उड्डाणे रद्द किंवा स्थगित केली आहेत. डीजीसीएने ज्या 11 देशांच्या हवाई हद्दीतून विमान कंपन्यांना उड्डाण टाळण्याचा सल्ला दिला आहे त्यात इराण, इस्रायल, लेबनॉन, युएई, सौदी अरेबिया, बहरीन, ओमान, इराक, जॉर्डन, कुवेत आणि कतार यांचा समावेश आहे. डीजीसीएने म्हटले आहे की हा निर्णय आंतरराष्ट्रीय सुरक्षा मानकांनुसार आणि युरोपियन युनियन एव्हिएशन सेफ्टी एजन्सीच्या संघर्ष क्षेत्र बुलेटिननुसार घेण्यात आला आहे. दरम्यान, इराणने आखाती देशांवर हल्ले केल्यामुळे भारतात येणारी अनेक उड्डाणं रद्द करण्यात आली असून दुबईतील सर्व विमानतळ सध्या बंद ठेवण्यात आले आहेत. अनेक विमाने रद्द झाल्यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत. अनेक प्रवासी विमानतळावर अडकले आहेत.

जगभरातील हवाई वाहतुकीवर परिणाम

अमेरिका-इस्रायल आणि इराण युद्धाचा जगभरातील विमान वाहतुकीला फटका बसला आहे. जगभरातील हजारो विमान उड्डाणे रद्द करण्यात आली आहे.
हवाई हद्द अचानक बंद झाल्यामुळे शेकडो उड्डाणांवर परिणाम झाला. फ्लाइट ट्रॅकिंग वेबसाइटनुसार, अनेक विमाने वेगवेगळ्या हवाई हद्दीत घिरट्या घालताना दिसली आणि अनेकांना वळवावे
लागले.