Home Featured सुन्नी गुलिस्थान मशीद खुली करण्याचा निर्णय

सुन्नी गुलिस्थान मशीद खुली करण्याचा निर्णय

0

घोगळ येथील सुन्नी गुलिस्थान मशिदीबाहेर 30 जानेवारी रोजी खुनाची घटना घडल्याने कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने मशिदीला टाळे ठोकले होते. आता ती मशीद खुली करण्याचा निर्णय दक्षिण गोवा जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आहे.
रमजान ईदसाठी मशीद खुली करावी, अशी मागणी स्थानिकांनी केली होती. त्यानंतर जिल्हाधिकारी यांच्याबरोबर पोलीस व या शिष्टमंडळाची बैठक झाली. तसेच स्थानिक आमदार रेजिनाल्ड लॉरेन्स, भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांच्याकडे मशीद खुली करण्याची मागणी केली होती. शेवटी जिल्हाधिकाऱ्यांनी चर्चा करून मशीद खुली करण्याचा निर्णय घेतला. काल उपजिल्हाधिकारी गणेश बर्वे यांनी स्थानिक व पोलीस अधिकारी यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर मशीद खुली करण्याचा आदेश काढला.