राज्य सरकारने ऑनलाईन सेवांसाठी एआय चॅटबॉट सुरू केला आहे. एआय चॅटबॉटमुळे ऑनलाईन सेवेत नागरिकांना येणाऱ्या अडचणी सोडविण्यास मदत होणार आहे, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी म्हटले आहे. गोवा सरकारच्या डिजिटल सेवेतील चॅटबॉट हा पुढील टप्पा असून, गोवा ऑनलाईन या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला आहे. संकेतस्थळावरील 150 हून अधिक ऑनलाईन सेवा जलदगतीने मिळण्यास मदत होणार आहे.