Home बातम्या ‘ओला’च्या मालकाविरुद्ध जारी वॉरंटला स्थगिती

‘ओला’च्या मालकाविरुद्ध जारी वॉरंटला स्थगिती

0

मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने दक्षिण गोवा जिल्हा ग्राहक मंचाने ओला इलेक्ट्रिक टेक्नॉलॉजीचे मालक भाविश अगरवाल यांच्याविरोधात जारी केलेल्या वॉरंटला काल स्थगिती दिली. दक्षिण गोवा जिल्हा ग्राहक मंचाने एका प्रकरणामध्ये सुनावणीच्या वेळी गैरहजर राहिल्याने ‘ओला’चे मालक भाविश अगरवाल यांच्याविरुद्ध हा वॉरंट 4 फेब्रुवारी 2026 रोजी जारी केला होता. ओला कंपनीने मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात एक याचिका दाखल करून त्या वॉरंटला आव्हान दिले आहे.