पणजी महानगरपालिकेच्या 11 मार्च 2026 रोजी होणाऱ्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला कालपासून प्रारंभ झाला; परंतु पहिल्या दिवशी एकही उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला नाही. महानगरपालिका निवडणुकीसाठी येत्या 24 फेब्रुवारीपर्यंत उमेदवारी अर्ज स्वीकारले जाणार आहेत. महानगरपालिका निवडणूक पक्षीय पातळीवर लढविली जात नसली तरी राजकीय पक्षांकडून निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी केली जात आहे. भाजप आणि आमदार बाबूश मोन्सेरात यांच्याकडून एक पॅनल तयार केले जात आहे, तर काँग्रेस पक्ष समविचारी नेत्यांसोबत निवडणुकीसाठी चर्चा करीत आहे.