Home बातम्या राज्यातील अंतिम मतदार यादी21 रोजी जाहीर होणार

राज्यातील अंतिम मतदार यादी21 रोजी जाहीर होणार

0

राज्यातील विशेष सखोल पुनरावलोकन (एसआयआर) प्रक्रियेनंतर अंतिम मतदार यादी येत्या 21 फेब्रुवारी 2026 रोजी जाहीर केली जाणार आहे. राज्यातील एसआयआरनंतर मसुदा यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. तसेच, ज्या मतदारांची नावे 2002 च्या मतदार यादीशी जुळत नाहीत. त्यांना नोटीस पाठवून सुनावणी घेण्यात आली होती. सुनावणी प्रक्रियेनंतर पात्र नावांचा समावेश अंतिम मतदार यादीत केला जाणार आहे. अंतिम मतदार यादीमध्ये नावाचा समावेश न झाल्यास मतदार 30 दिवसांत संबंधित निवडणूक अधिकाऱ्याकडे अपील करता येणार आहे. मतदारांनी जाहीर केली जाणारी मतदार यादी तपासून घ्यावी, असे आवाहन मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने केले आहे.