Home बातम्या हडफडेतील बांधकाम पाडण्याच्याआदेशाला न्यायालयात आव्हान

हडफडेतील बांधकाम पाडण्याच्याआदेशाला न्यायालयात आव्हान

0

हडफडे येथील बर्च बाय रोमियो लेनमधील बेकायदा बांधकाम पाडण्याच्या हडफडे ग्रामपंचायतीच्या आदेशाला आता जिल्हा न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. अतिरिक्त पंचायत संचालकांनी अपिल फेटाळल्याने जमीन मालक सुरिंदर कुमार खोसला यांनी जिल्हा न्यायालयात धाव घेतली असून या प्रकरणी 23 फेब्रुवारीला सुनावणी घेतली जाणार आहे. तोपर्यत पंचायतीच्या आदेशाला तात्पुरती स्थगिती देण्यात आली आहे, अशी माहिती याचिकाकर्ता खोसला यांच्या वतीने वकील सेबॅस्टियन वेल्स यांनी दिली. युकेचे नागरिक आणि मालमत्ता मालक असलेले खोसला यांनीही त्यांच्याविरुद्ध पोलिसांनी जारी केलेल्या लुक आऊट नोटीसला आव्हान देत सत्र न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल केली आहे.