सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) पणजी विभागीय कार्यालयाने यूको बँकेच्या सुवर्ण कर्ज घोटाळ्याप्रकरणी पीएमएलए अंतर्गत सुमारे 1.17 कोटी रुपये किमतीच्या जंगम आणि स्थावर मालमत्ता तात्पुरत्या स्वरूपात जप्त केल्या आहेत. हेमंत रायकर आणि गुंडू केळवेकर यांनी बनावट सोन्याच्या दागिन्यांचा वापर करून 20 व्यक्तींच्या नावे 32 कर्जे मिळवण्याचा कट रचल्याचा आरोप आहे. या गुन्ह्यातून मिळालेली एकूण रक्कम सुमारे 2.81 कोटी इतकी असल्याचा अंदाज ईडीने व्यक्त केला आहे.