Home Featured देश विकताना तुम्हाला लाजवाटली नाही का? : राहुल गांधी

देश विकताना तुम्हाला लाजवाटली नाही का? : राहुल गांधी

0

संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन पहिल्या दिवसापासूनच गोंधळ आणि खडाजंगीने गाजत असल्याचे पाहायला मिळत आहे. काल लोकसभेत अर्थसंकल्पावरील चर्चेदरम्यान विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी आपल्या भाषणात भारत-अमेरिका कराराचा मुद्दा उपस्थित करताच लोकसभेत गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. तुम्ही (केंद्र सरकारने) भारत विकला. तुम्हाला भारत विकताना लाज वाटली नाही का? तुम्ही आमची आई, भारतमाता विकली आहे, अशा शब्दांत राहुल गांधी यांनी हल्लाबोल केला.
राहुल गांधींनी आपल्या भाषणात वारंवार अदाणी, अंबानी व अमेरिकेतील एपस्टाईन फाईल्सच्या खटल्याचा मुद्दा उपस्थित केल्यानंतर सत्ताधारी बाकांवरून संसदीय कार्यमंत्री किरण रिजिजू, प्रल्हाद जोशी यांनी तीव्र आक्षेप घेतला. यावेळी लोकसभा अध्यक्षांच्या खुर्चीवर बसलेले तालिका अध्यक्ष जगदंबिका पाल यांनीदेखील राहुल गांधींना वारंवार थांबवत याबाबत समज दिली. यानंतरही राहुल गांधींनी भारत व अमेरिका यांच्यादरम्यान झालेल्या करारावरून पंतप्रधानांवर परखड शब्दांत हल्लाबोल केला.
आता अमेरिका ठरवणार की भारत कुणाकडून तेल खरेदी करणार, आपले पंतप्रधान ते ठरवणार नाहीत. अमेरिका आपल्यावर कायम लक्ष ठेवणार. जर भारताने अमेरिकेची इच्छा नसलेल्या कुठल्या देशाकडून तेल खरेदी केले, तर ते भारताला शिक्षा करतील, असेही ते म्हणाले.