Home बातम्या शिक्षण मंडळाकडून‘ते’ परिपत्रक स्थगित

शिक्षण मंडळाकडून‘ते’ परिपत्रक स्थगित

0

गोवा माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दुसऱ्या सत्रातील इयत्ता नववीच्या परीक्षेतील सर्व विषयाच्या प्रश्नपत्रिका विद्यालयांना तयार करण्यास मान्यता देणारे परिपत्रक स्थगित ठेवले आहे. शालांत मंडळाकडून नववीच्या प्रश्नपत्रिका तयार करून विद्यालयांना पाठविण्यात येणार आहेत. शालांत मंडळाचे सचिव व्ही. बी. नाईक यांनी यासंबंधीचे परिपत्रक सर्व विद्यालयांना पाठविले आहे.