करासवाडा-म्हापसा येथील औद्योगिक वसाहतीत ट्रक खाली चिरडून एका अज्ञात व्यक्तीचा मृत्यू झाला. ही घटना शनिवारी पहाटे उघडकीस आली. पार्क करण्यात आलेल्या ट्रकखाली मयत झोपलेला असताना ही घटना घडली. घटनेनंतर ट्रकचालकाने घटनास्थळावरून ट्रकसह पळ काढला. ट्रक आणि चालकाचा शोध पोलिस घेत आहेत. शुक्रवारी घडलेल्या दुसऱ्या एका अपघातात टिटो-कांदोळी येथे दुचाकीची पदपथाला धडक बसून शिवनेश दामोदर बांदोडकर (वय 28, रा. गौरावाडा, कळंगुट) या तरुणाचे निधन झाले.