Home बातम्या अरविंद केजरीवालयांचे गोव्यात आगमन

अरविंद केजरीवालयांचे गोव्यात आगमन

0

आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय निमंत्रक तथा दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे तीन दिवसांच्या गोवा दौऱ्यावर काल आगमन झाले. या दौऱ्यात ते पक्षाचे गोव्यातील नेते व कार्यकर्ते यांच्याशी संवाद साधून त्यांना पक्षाच्या संघटनात्मक कार्याला गती देण्यासह विस्तार व डावपेचांबाबत त्यांच्याशी चर्चा करणार असल्याचे पक्षसूत्रांनी सांगितले. दरम्यान,गोव्यातील जनतेला आता बदल हवा असून, ते आम आदमी पक्षाकडे मोठ्या आशेने पाहत आहेत, असे अरविंद केजरीवाल यांनी काल पत्रकारांशी बोलताना सांगितले.