Home बातम्या लुथरा बंधूंच्या जामीनअर्जावरील निवाडा राखीव

लुथरा बंधूंच्या जामीनअर्जावरील निवाडा राखीव

0

म्हापसा येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने हडफडे येथील बर्च बाय रोमियो लेन आग प्रकरणात सौरभ लुथरा आणि गौरव लुथरा यांच्या जामीन अर्जावरील सुनावणी काल पूर्ण केली असून निवाडा 5 फेब्रुवारीपर्यंत राखून ठेवला आहे. हणजूण पोलिसांनी बर्च आग प्रकरणात या नाईटक्लबचे मालक लुथरा बंधूना अटक केली आहे. संशयित लुथरा बंधूंनी जामिनासाठी म्हापसा येथील अतिरिक्त जिल्हा न्यायालयात अर्ज दाखल केला आहे.