Home बातम्या संभलमध्ये अनिधिकृत2 मशिदी जमीनदोस्त

संभलमध्ये अनिधिकृत2 मशिदी जमीनदोस्त

0

संभलमध्ये रविवारी दोन अनधिकृत मशिदी आणि एक मदरसा पाडण्यात आला. असमोली पोलिस ठाण्याच्या हाजीपूर गावात बुलडोझर कारवाईपूर्वीच एका मशिदीला गावातील लोकांनी स्वतःच पाडले. लोकांनी रात्रभर हातोडा आणि छिन्नीने मशीद पाडली. ही मशीद 1339 चौरस मीटर (दीड बिघा) जागेत बांधली होती. सकाळी जेव्हा प्रशासनाचे पथक पोहोचले, तेव्हा तिथे मशिदीच्या जागी ढिगारा पडलेला होता. दुसरी कारवाई हाजीपूरमध्येच झाली. मशिदीपासून 500 मीटर अंतरावर पथक मदरसा पाडण्यासाठी पोहोचले. ढोल वाजवून दवंडी पिटवण्यात आली. तीन बुलडोझरच्या साहाय्याने 1500 चौरस मीटर जमिनीवर बांधलेला अवैध मदरसा पाडला गेला. डीएम-एसपी आणि मोठ्या संख्येने पोलिस दल घटनास्थळी तैनात होते. यावेळी ड्रोनद्वारे पाळत ठेवली गेली होती. दरम्यान, तिसरी कारवाई मदरशापासून सुमारे 11 किमी दूर राया बुजुर्ग गावात झाली. दोन बुलडोझरच्या साहाय्याने 1500 चौरस मीटरमध्ये बांधलेली मशीद पाडली गेली. ही मशीद सरकारी जमिनीवर बांधली होती. 2 ऑक्टोबर रोजी बुलडोझर कारवाईची नोटीस देण्यात आली होती.