Home Featured साताऱ्यात 99 व्या अखिल भारतीयमराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन

साताऱ्यात 99 व्या अखिल भारतीयमराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन

0

साताऱ्यातील ऐतिहासिक शाहू स्टेडियम येथे काल 99 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन झाले. हे संमेलन 4 जानेवारीपर्यंत चालणार आहे.
महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे शाखा शाहूपुरी आणि मावळा फाउंडेशन सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने हे संमेलन आयोजित करण्यात आले आहे. चार दिवस चालणाऱ्या या भव्य साहित्य संमेलनात विचारमंथन, काव्यवाचन आणि सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून मराठी साहित्यविश्व एकत्र येत आहे.
साहित्य संमेलन म्हणजे फक्त एक कार्यक्रम नसतो, तर तो आचार विचाराची आणि देशाला दिशा देण्याचा कार्यक्रम असतो. काँग्रेसची स्थापना होण्याआधीही मराठी साहित्य संमेलनाची सुरुवात झाल्याचे ज्येष्ठ साहित्यिक आणि साहित्य संमेलनाचे अध्यक्ष विश्वास पाटील यांनी नमूद केले. एका शेतकऱ्याच्या मुलाला साहित्य संमेलनाचा अध्यक्ष केला ही मोठी गोष्ट असल्याचे विश्वास पाटील म्हणाले.
साहित्य संमेलनासाठी एका पाटलाला अध्यक्ष करा अशी मागणी कुलकर्णी-जोशींनी केली. बिघडलेला गाव जर सुधारायचा असेल तर पाटील आणि कुलकर्ण्यांना युती करावीच लागते. ही आपली जुनी वहिवाट आहे, अशी खुमासदार टिप्पणीही विश्वास पाटील यांनी केली.