Home बातम्या कोरगावात आरबीआय पोलिसाची आत्महत्या

कोरगावात आरबीआय पोलिसाची आत्महत्या

0

गावडेवाडा-कोरगाव येथील 42 वर्षीय आरबीआय पोलीस कर्मचाऱ्याने आत्महत्या केल्याचा प्रकार काल उघडकीस आला. सिद्धेश्वर वसंत गावडे असे मृत पोलिसाचे नाव असून, त्यांनी आपल्या घरातच गळफास घेत आत्महत्या केली.
मिळालेल्या माहितीनुसार, सिद्धेश्वर गावडे हा आरबीआय पोलीस कर्मचारी मागच्या सहा महिन्यापासून मानसिक तणावाखाली होता. तो वेळेवर कामावर जात नव्हता. शिवाय वेळेवर औषध घेण्याचेही तो टाळत होता. सोमवारी रात्री बारानंतर तो घरी आला होता. मात्र तो झोपत नसल्याने वडिलांनी त्याची विचारपूस केली. त्यावेळी त्याने आपण इथेच सोफ्यावर झोपणार, असे सांगितले. यानंतर तो पहाटे 4 वाजता उठला आणि वडिलांकडून वरच्या मजल्यावर खोलीची किल्ली घेत तो तिथे गेला. सकाळ झाल्यानंतर 11 वाजले तरी तो उठला नसल्याने वडिलांनी त्याला हाक मारली असता त्याने कोणताही प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे दरवाजा तोडून खोलीच्या आत प्रवेश केला असता तो गळफास लावून घेतलेल्या स्थितीत आढळला. त्याला लगेचच खाली उतरून तुये इस्पितळात दाखल केले; मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. दरम्यान, मागच्या महिन्यातही त्याने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता.