Home Featured भाजपच्या राष्ट्रीय सरचिटणीसांकडूननिवडणुकीतील कामगिरीचा आढावा

भाजपच्या राष्ट्रीय सरचिटणीसांकडूननिवडणुकीतील कामगिरीचा आढावा

0

भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस बी. एल. संतोष यांचे गोव्यात काल आगमन झाले. यानंतर त्यांनी भाजप मुख्यालयात भाजपचे प्रदेशाध्यक्ष दामू नाईक, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, पक्षाचे मंत्री आणि आमदार आणि गाभा समितीच्या पदाधिकाऱ्यांसोबत एक तातडीची बैठक घेऊन पक्षाच्या संघटनात्मक कामकाज आणि आगामी विधानसभा निवडणूक विषयावर विचारमंथन केले. तसेच या बैठकीत राज्यातील जिल्हा पंचायत निवडणुकीतील भाजपच्या कामगिरीबाबत चर्चा करण्यात आली.

राज्यातील जिल्हा पंचायत निवडणुकीत भाजप-मगो आघाडीने विजय मिळवला आहे. तथापि, भाजपचे मंत्री, आमदार असलेल्या काही मतदारसंघांत भाजपच्या जिल्हा पंचायत निवडणुकीतील उमेदवारांना पराभव पत्करावा लागला. मंत्री नीळकंठ हर्ळणकर यांच्या मतदारसंघातील शिरसई आणि कोलवाळ या दोन्ही जिल्हा पंचायत मतदारसंघात भाजपच्या उमेदवारांना पराभव पत्करावा लागला. भाजपचे आमदार गोविंद गावडे यांच्या मतदारसंघातही भाजप उमेदवाराला पराभवाला सामोरे जावे लागले. भाजपचे आमदार असलेल्या कळंगुट, शिवोली, मये या मतदारसंघात जिल्हा पंचायत निवडणुकीत भाजप उमेदवारांना कमी मताधिक्य मिळाले आहे.

दरम्यान, सांताक्रूझचे उपसरपंच संदीप सावंत यांनी मंत्री बाबूश मोन्सेरात यांच्यावर भाजप उमेदवारांच्याविरोधात प्रचार केल्याचा
आरोप काल केला.

बी. एल. संतोष यांनी संघटनात्मक विषयावर मार्गदर्शन केले. जिल्हा पंचायत निवडणूक निकालाचा आढावा घेतला. तसेच आगामी विधानसभा निवडणुकीवर मार्गदर्शन केले, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली.