Home बातम्या ओंकार हत्तीचातोरसेत धुमाकूळ

ओंकार हत्तीचातोरसेत धुमाकूळ

0

ओंकार हत्तीने 30 नोव्हेंबरपासून पेडणे तालुक्यातील फकीरफाटा, उगवे, तांबोसे, निगळे असा प्रवास करत पुन्हा तोरसे भागात ठाण मांडून कवाथे, केळी फस्त करायला सुरुवात केली आहे. काल शेट्येवाडा, तोरसे येथे दुपारी 12 वाजता हत्तीने गोविंद शेट्ये, कृष्णा शेट्ये, सुभाष शेट्ये, मंगेश शेट्ये या शेतकऱ्यांच्या केळी, कवाथे आणि सुपाऱ्यांच्या झाडांचे लाखो रुपयांचे नुकसान केली. शिवाय हत्तीने गोविंद शेट्ये यांच्या गोठ्यातील काही कृषी यंत्रांची नासधूस केली. शिवराम शेट्ये, नकुल शेट्ये, एकनाथ शेट्ये, ओंकार शेट्ये यांच्या बागायतींचेही नुकसान करण्यास सुरूवात केली आहे. या हत्तीचा बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकऱ्यांनी आमदार प्रवीण आर्लेकर यांच्याकडे केली आहे. परंतु या हत्तीचा बंदोबस्त सरकारला करता येत नसल्यामुळे शेतकरी नाराज बनले आहेत. वन खात्याचे अधिकारी व कर्मचारी हत्ती नासाडी करत असलेली पाहतात. वन खात्याकडे कोणत्याच प्रकारची यंत्रणा उपलब्ध नसल्याने शेतकऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.