मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले स्पष्ट
इफ्फीचा उद्घाटन सोहळा आणि समारोप सोहळा वर्ष पद्धतीप्रमाणेच यंदाही बांबोळी येथील डॉ. शामाप्रसाद मुखर्जी स्टेडियम येथे होणार असल्याचे काल मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी स्पष्ट केले. काल पत्रकार परिषदेत मुख्यमंत्र्यांनी वरील माहिती दिली.
इफ्फीचा उद्घाटन सोहळा डॉ. शामाप्रसाद मुखर्जी स्टेडियम येथे होणार नसल्याची चुकीची माहिती सोशल मीडियावरून पसरविली जात असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. हे स्टेडियम फिडे वर्ल्ड कप बुद्धिबळ स्पर्धेसाठी देण्यात आलेले नाही, असा खुलासाही त्यांनी केला. इफ्फी फार मोठा महोत्सव आहे आणि त्यासाठीची तयारी अंतिम टप्प्यात आहे. इफ्फीच्या उद्घाटन सोहळ्याबरोबरच समारोप सोहळाही डॉ. मुखर्जी इनडोअर स्टेडियमध्येच होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.